Home Breaking News ऊर्जानगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

ऊर्जानगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

118

ऊर्जानगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

संपादक प्रशांत बिट्टूरवार इंडिया दस्तक न्यूज

ऊर्जानगर : येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
वाय फोर डी फॉउंडेशन पुणे आणि महापारेषन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत ऊर्जानगर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
यावेळी उदघाटक म्हणून सरपंच मंजुषा येरगुडे, ग्रामसेवक युवराज वेस्कडे, उपसरपंच अंकित चिकटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. साहस बेंदले, डॉ. स्नेहा बेंदले, आरोग्य सेविका रुचिता चांदेकर,नेत्र चिकित्सा अधिकारी लाडे, ग्रामपंचायत सदस्य मदन चिवंडे, राजूभाऊ डोनकावळे, योगिता रत्नपारखी, महापारेषण विभागाचे रोशन वांढरे, स्वयंसेवक नागेश मादेशी, अरुण चिवंडे, सुरेश मानकर उपस्थित होते.
यावेळी एकूण 216 नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. मोफत बीपी शुगर तपासणी,नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणीमोफत चष्मा वितरण करण्यात आले.
सदर शिबिरात ग्रामपंचायत चे अधिकारी व कर्मचारी, शिबीर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Don`t copy text!