Home Breaking News कत्तलीसाठी नेली जाणारी सहा जनावरे रेगडी पोलिसांच्या ताब्यात

कत्तलीसाठी नेली जाणारी सहा जनावरे रेगडी पोलिसांच्या ताब्यात

317

कत्तलीसाठी नेली जाणारी सहा जनावरे रेगडी पोलिसांच्या ताब्यात

बजरंग दल रेगडी शाखेचे सदस्य केली जंगलात गस्त 
रेगडी प्रतिनिधी |
चामोर्शी तालुक्यातील रेगडी परिसरात कत्तलीसाठी नेली जात असलेली सहा जनावरे रेगडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीन संशयितांना दुचाकीसह पकडण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेगडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कुणाल इंगळे पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, तलाव परिसरातील जंगल मार्गाने काही व्यक्ती जनावरे घेऊन जात आहेत. सदर माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ स्थानिक पातळीवर खबरदारीची सूचना दिली.
माहिती मिळताच बजरंग दल रेगडी शाखेचे अध्यक्ष प्रशांत शाहा, सम्राट मंडल, प्रवीण पोटावी, ऋतिक कुसराम आणि पोस्टे रेगडी चे प्रभारी अधिकारी कुणाल इंगळे, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी शेलार, हवलदार/2141 रेमाजी पोरटे,महिला हवलदार/241 अरुणा हलमी,पोशी/5969 आशिष सोनमणावर, पोशी/4334 बालाजी येलमुळे यांनी संबंधित परिसरात गस्त घातली. तलावाजवळील जंगल भागात शोधमोहीम राबवित असताना दोन संशयित व्यक्ती सहा जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले.तसेच दुचाकी चालकास आणि दुचाकीही जप्त करण्यात आली.त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
रेगडी पोलिसांनी जनावरे ताब्यात घेतली असून तिघा संशयितांची संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 कलम 5(अ), 5(ब),9 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.
सदर ची कार्यवाही ही मा. उवविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Don`t copy text!