Home Breaking News गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया – 2026) मैदानी (शारीरिक)...

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया – 2026) मैदानी (शारीरिक) चाचणी 11 फेब्रुवारीपासून…

124

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-2025
(प्रत्यक्ष भरती प्रक्रिया – 2026)
मैदानी (शारीरिक) चाचणी दि. 11 फेब्रुवारीपासून सुरू

मुख्य संपादक प्रशांत शाहा 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया 2024-2025 (प्रत्यक्ष भरती 2026) अंतर्गत मैदानी (शारीरिक) चाचणी दि. 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया दि. 08 मार्च 2026 पर्यंत गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर राबविण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेत चालक पोलीस शिपाई पदासाठी एकूण 27 जागा असून दि. 11/02/2026 ते 13/02/2026 या कालावधीत त्याची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच पोलीस शिपाई पदाच्या एकूण 717 जागांसाठी दि. 14/02/2026 ते 07/03/2026 या कालावधीत मैदानी चाचणी पार पडणार आहे.
अर्ज व उमेदवारांची संख्या
चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई या दोन्ही पदांसाठी एकूण 27,087 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
चालक पोलीस शिपाई (27 पदे) : 3,296 अर्ज
पुरुष : 2,797
महिला : 499
पोलीस शिपाई (717 पदे) : 23,791 अर्ज
पुरुष : 16,310
महिला : 7,481
आरक्षणनिहाय पदवाटप
चालक पोलीस शिपाई (27 पदे) :
अनुसूचित जाती – 03, अनुसूचित जमाती – 06, विज (अ) – 01, भज (ब) – 01, भज (क) – 01, भज (ड) – 01, विमाप्र – 01, इमाव – 05, एसईबीसी – 02, ईडब्ल्यूएस – 02, अराखीव – 04.
पोलीस शिपाई (717 पदे) :
अनुसूचित जाती – 84, अनुसूचित जमाती – 92, विज (अ) – 08, भज (ब) – 08, भज (क) – 08, भज (ड) – 15, विमाप्र – 08, इमाव – 121, एसईबीसी – 58, ईडब्ल्यूएस – 58, अराखीव – 257.
भरती प्रक्रियेची महत्त्वाची माहिती
दि. 11/02/2026 रोजी पहिल्या दिवशी सुमारे 1,300 उमेदवारांची, त्यानंतर दररोज सरासरी 1,500 उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे.
प्रत्येक उमेदवाराकडे गडचिरोली जिल्ह्याचे वैध रहिवासी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
सर्व प्रमाणपत्रे व कागदपत्रे दि. 07/12/2025 पूर्वीची असणे बंधनकारक आहे.
भरती प्रक्रियेदरम्यान बंदोबस्तासाठी 69 अधिकारी व 482 पोलीस अंमलदार, असे एकूण 551 मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
अत्याधुनिक व पारदर्शक प्रक्रिया
सदर भरती प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्णतः पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
उंची व छाती मोजणीसाठी PST (Digital Physical Standard Test) तंत्रज्ञान
1600 मी. धावणे (पुरुष), 800 मी. धावणे (महिला), 100 मी. धावणे (पुरुष/महिला) साठी RFID Based Technology
गोळा फेक चाचणीसाठी Prism Technology
मैदानी चाचणीत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करण्यात येणार आहे.
प्रवेशपत्र व सूचना
सर्व उमेदवारांची मैदानी (शारीरिक) चाचणीचे प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र
https://policerecruitment2024.mahait.org�
या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार आवश्यक कागदपत्रांसह पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे वेळेत हजर राहावे.
पावसामुळे किंवा एकाच दिवशी एकापेक्षा जास्त ठिकाणी चाचणीची तारीख आल्यास संबंधित उमेदवारांना पर्यायी तारीख देण्यात येईल. इतर अडचणींचे निरसन स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे.
गैरप्रकारास कठोर कारवाई
भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग अवलंबल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अशा प्रकारची माहिती असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथील समाधान कक्ष (दूरध्वनी क्र. 8806312100) किंवा नजीकच्या पोलीस कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.

Don`t copy text!