चामोर्शी शहरातील क्रीडांगण यावर्षी तरी सुरू होईल काय?
राष्ट्रीय मानवाधिकार संघठण जिल्हा गडचिरोली

प्रतिनिधी सतीश कुसराम
चामोर्शी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठा तालुका असलेला स्थानिक चामोर्शी येथे जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून क्रीडांगणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे परंतु अजून पर्यंत क्रीडांगणाचे काम पूर्ण झाले नाही क्रीडांगणातील आवश्यक सोयी सुविधाची कामे संबंधित कंत्राटदार विहित कालावधीत पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे या क्रिडांगणावर दररोज सकाळी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी व्यायाम करण्यासाठी येतात या ठिकाणी मैदानात मोठ्या हिरव्यागार झुळप तयार झालेले आहेत. याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना वारंवार अवगत करण्यात आले आहे, निदान सध्यातरी दररोज व्यायाम करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना क्रीडांगण व्यवस्थित करून देण्यात यावे
परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही? त्यामुळे शहरातील क्रीडांगण यावर्षी तरी पूर्ण होईल का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी लवकरात लवकर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित कंत्राटदारास तात्काळ क्रीडांगणाची संपूर्ण कामे पूर्ण करण्यास तंबी द्यावी व प्रलंबित सर्व कामे करून घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघठण जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केली आहे.







