नेहमी चर्चेत असलेला फेसबुक प्यार पुन्हा समोर!शारीरिक संबंध झाल्याने पोलिसात तक्रार दाखल,आरोपी फरार.
मुख्य संपादक प्रशांत शाहा

चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीची चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील ३१ वर्षीय तरुणाशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अश्यातच तरुणाने प्रेम संबंधातून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे शारीरिक शोषण केले. मात्र, मुलगी बघण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मुलगी नापसंद आल्याने लग्न करण्यास नकार देण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी सौरभचित्तरंजन विश्वास वय ३१ वर्षे, रा. पळसगाव, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदविला असून अद्याप आरोपी फरार आहे.







