वरोरा तालुक्यातील नागरी येथे ग्रामपंचायत भवन व शहीद स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न

71

वरोरा शहर प्रतिनिधी संकेत कायरकर
दि. ६-१२-२०२५
वरोरा : तालुक्यातील नागरी गावात ग्रामपंचायत भवन आणि शहीद स्मारक या दोन महत्त्वपूर्ण विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा ऐतिहासिक कार्यक्रम वणी चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

नागरी ग्रामपंचायत भवन आता आधुनिक सुविधांनी युक्त असे प्रशासकीय केंद्र म्हणून ग्रामस्थांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि सक्षम होईल. नागरिकांच्या दैनंदिन प्रशासकीय अडचणींचे निवारण यामुळे अधिक सुलभ होणार आहे.

याचबरोबर, देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे लोकार्पण देखील खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे स्मारक गावाच्या इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय ठरेल. राष्ट्रसेवा, देशभक्ती आणि त्यागाची भावना पुढील पिढ्यांना यामुळे सतत प्रेरणा देत राहणार आहे.

या यशस्वी समारंभासाठी अथक परिश्रम घेतलेल्या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच सर्व ग्रामस्थांचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.