मनगटात बळ असेल तर विरोधी बाकावरूनही विकास शक्य – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार

44

चिचखेडा व पातळी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमीपुजन

संपादक प्रशांत बिट्टूरवार

ब्रम्हपूरी मतदारसंघांचा लोकप्रतिनिधी म्हणून मागील दहा वर्षांपासून प्रतीनीधीत्व करत असतांना कधी अल्प काळ सत्तेत तर दीर्घकाळ विरोधी बाकावर होतो. मात्र विरोधी बाकावर बसून देखील ब्रम्हपूरी मतदारसंघांच्या विकासासाठी निधीची कमतरता कधीच पडु दिली नाही. कोट्यवधी रुपयांची विकासकामे मतदारसंघात पुर्णत्वास आणली. कारण मनगटात बळ असेल विरोधी बाकावर बसुनही विकास करता येतो असे प्रतिपादन विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपूरी तालुक्यातील चिचखेडा व पातळी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, सरपंच संजना घुटके, उपसरपंच लोकेश चौके, वांद्रा उपसरपंच गुरुदेव वाघरे, पं.स. तांत्रिक अधिकारी रंजीत कसारे, कृउबा माजी सभापती मनोहर गजबे, उपसरपंच सुरेश ठिकरे, पोलिस पाटील रणवीर ठाकरे, भास्कर राऊत, सुधीर पंदिलवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आज पार पडलेल्या विकासकामांमध्ये पातळी गणेशपुर येथे बौध्द समाज मंदिर लोकार्पण (१५ लक्ष), चिचखेडा येथे नवीन ग्रामपंचायत भवन लोकार्पण (२५ लक्ष), माणिकादेवी समाज भवन लोकार्पण (२० लक्ष), नवीन अंगणवाडी इमारत लोकार्पण (१५ लक्ष), जिल्हा परिषद शाळेत नवीन वर्गखोली लोकार्पण (२० लक्ष), या कामांचा समावेश आहे.
पुढे बोलताना विधीमंडळ काॅंग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतीनीधीत्वाची सुत्रे हाती घेताच क्षेत्रातील विकासापासून वंचित असलेल्या ग्रामखेड्यांचा विकास प्राधान्यक्रमाने करावयाचे ठरवले. त्यानुसार ग्रामीण नागरिकांच्या मुलभूत सुविधा व गरजा जाणून त्याकरिता शासन स्तरावर सतत पाठपुरावा करत कोट्यवधींचा विकासनीधी मिळवून दिला. सोबतच शहरी भागातही मुलभूत गरजांची पूर्तता केली. भविष्यात ब्रम्हपूरी मतदारसंघांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणार असेही ते म्हणाले. यावेळी चिचखेडा व पातळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.