भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची ठाकुरनगर येथील नामकीर्तन महोत्सवाला भेट

120

भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांची ठाकुरनगर येथील नामकीर्तन महोत्सवाला भेट

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट

आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्व अधिक वाढले असून समाजामध्ये सद्भावना, एकोपा आणि सकारात्मकता निर्माण करण्याचे कार्य अशी कार्यक्रम करत आहेत, असे प्रतिपादन भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी नामकीर्तन महोत्सव प्रसंगी केले.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेवजी सोनटक्के,
तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी विलास भाऊ उईके, विकास मैत्र,आनंदग्राम येथील बूथ भाजप कार्यकर्ते सुशंकर मंडल यांची विशेष उपस्थिती लाभली

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहून नामस्मरणात सहभागी झाले.
धार्मिक कार्यक्रमातून समाजात प्रेम, शांती आणि एकात्मता वाढावी अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.