धुडेपल्ली येथे जय पेरसापेन क्रीडा मंडळ आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेला उत्साहात सुरुवात

61

प्रतिनिधी रवींद्र सदमवार

धुडेपल्ली : जय पेरसापेन क्रीडा मंडळ, धुडेपल्ली यांच्या वतीने आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज दि. १ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक अजय भाऊ कंकडलवार तसेच सहउद्घाटक हनुमंतु मडावी हे अत्यावश्यक कारणास्तव उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.

स्पर्धेचे भव्य उद्घाटन श्री. लक्ष्मीकांत बोगामी, काँग्रेस कमिटी अध्यक्ष भामरागड यांच्या हस्ते संपन्न झाले.
तसेच जय सेवा ध्वजवंदन समारंभ मान्यवर सन्याशी मातरमी यांच्या हस्ते पार पडला.

उद्घाटनावेळी मैदानावर विष्णू मडावी (न.प.भामरागड,उपाध्यक्ष), प्रवीण मोगरकर, दानू आत्राम, सोमजी उसेंडी, सूरज पुंगती, पेका मत्तामी, सिद्ध मत्तामी, साधू मडावी, सोमजी आत्राम, बिदा आत्राम, आकाश मत्तामी, संतोष आत्राम, नंदू पुंगती, रामजी मडावी यांसह ग्रामस्थ, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी नेटजवळ फीत कापून स्पर्धेचा शुभारंभ केला. मैदानावरील उत्साह, खेळाडूंचा जोश आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

या स्पर्धेत व्हॉलीबॉल आणि कबड्डी या दोन्ही क्रीडा प्रकारांचे सामने आयोजित करण्यात आले असून विजेत्या संघांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर केली आहेत.
उत्तम मैदान व्यवस्था, पंचांची उपस्थिती आणि सुबक नियोजनामुळे स्पर्धेचा दर्जा अधिक भव्य होणार आहे.

ग्रामीण तरुणांना आपली क्रीडाक्षमता प्रदर्शित करण्यासाठी ही स्पर्धा एक प्रभावी व्यासपीठ ठरत असून, स्थानिक क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळत आहे.