आनंद निकेतन महाविद्यालयातील खाऊ गल्ली सजली विविध खाद्य पदार्थांनी…

50

प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. भारताची खाद्य संस्कृती ही तर जगभरात प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील विविध चवीचे पदार्थ ,खाण्याची लज्जत वाढवितात.
विविध राज्यातील पदार्थ त्या राज्याची ओळख दाखवितात. आणि भारतीयांना एकमेकांशी जोडून ठेवतात. याच धर्तीवर
आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात विविध राज्याच्या खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले. विविध पदार्थांनी नटलेली खाऊ गल्ली तयार करण्यात आली. यामध्ये कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाराष्ट्रीयन, गुजराती, राजस्थानी, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातील खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी तयार करून आणले व विक्रीस ठेवले. इडली सांबर, भरीत भाकरी, पाणीपुरी ढोकळा, श्रीखंड, चंपाकली रोज कुकी, कप केक,ब्राउनी समोसा, दही समोसा, फ्रुट सॅलड, पुरी भाजी, मिसळ पाव, लिट्टी चोखा, दाल बाटी असे अनेक पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता माननीय प्राचार्य डॉक्टर काळे सर उपप्राचार्य राधा सवाने आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता सांस्कृतिक विभाग प्रमुख दीप्ती चिटणीस मॅडम आणि किरण लांजेवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने खाऊगल्ली, पदार्थांची रेलचेल उत्स्फूर्तपणे पार पडली.
विशेष म्हणजे या उपक्रमातून विद्यार्थ्याना काम करा आणि कमवा, कमवा आणि शिका हा संदेश देण्यात आला.