संदीप झुंबा फिटनेस व योगा क्लासेसचा थाटात शुभारंभ…

186

नगराध्यक्षा रेखाताई मोहूर्ले यांच्या हस्ते उद्घाटन

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली

​एटापल्ली : आदिवासी संस्कृती गोटूल भवन येथे दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संदीप झुंबा फिटनेस व योगा क्लासेसचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला.एटापल्ली नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रेखाताई मोहूर्ले यांच्या शुभहस्ते या फिटनेस क्लासेसचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
​यावेळी अनेक मान्यवरांची आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

​या उद्घाटन समारंभाला नगरसेवक राघवेंद्र सुल्वावार, राहुल कुळमेथे,जितेंद्र टिकले, निर्मलाताई नल्लावार यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील राकेश तेलकुंटलवार,शैलेश आकुलवार आणि महेंद्र सुल्वावार यांच्यासह
संदिप जंबोजवार,कनिका सरकार,आरती कोरेत,प्रवीण आलोने,राजकुमार,अक्षय येमला व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली आणि संदीप झुंबा फिटनेस व योगा क्लासेसला शुभेच्छा देण्यात आल्या.

​एटापल्लीतील नागरिकांचे आरोग्य आणि फिटनेस जतन करण्याच्या उद्देशाने सुरू होणारे हे क्लासेस दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ पासून नियमितपणे सुरू होणार आहेत.या क्लासेसची वेळ सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत असणार आहे.
​क्लासेसच्या आयोजकांनी एटापल्ली शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी या फिटनेस आणि योगा क्लासेसचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
​संदीप झुंबा फिटनेस व योगा क्लासेसच्या माध्यमातून शहरवासीयांना आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.