जिवती शहरातील व्यापारी बांधवानी आज चौथ्या दिवशी मार्केट बंद ठेऊन उपोषणाला पाठिंबा
बळीराम काळे, जिवती
जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनानी अतिवृष्ठीची आर्थिक मदत जाहीर केल्या प्रमाणे हेक्टरी 8500 रुपये तात्काळ सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे.व जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्यात यावे,भारी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे,जिवती तालुक्यातील कोदेपूर, गुडशेला, जिवती येथील तलावाचे बंद पडलेले काम सुरु करण्यात यावे,आसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा पेदाआसापूर येथे सिंचन तलाव मंजूर करण्यात यावे,टेकामांडवा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा धोंडामांडवा येथे सिंचन तलाव मंजूर करण्यात यावे,माराईपाटण येथील देवस्थानाचे सौंदर्यकरण करण्यात यावे. या विविध मागण्या घेऊन जिवती तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आज चार दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे.आणि कोणताही शासकीय व प्रशासकीय लोक येऊन या शेतकऱ्यांची व्यथा काय आहे यांची मागणी काय आहे याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी जिवती शहरातील व्यापारी असोसिएशन ने संपूर्ण मार्केट कडकडीत बंद करून या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवीला आहे.







