Home Breaking News समाजसेविका शितलताई भोलुभाऊ सोमनानी यांच्या पुढाकाराने रुग्णाला पुन्हा मिळाले रक्त…

समाजसेविका शितलताई भोलुभाऊ सोमनानी यांच्या पुढाकाराने रुग्णाला पुन्हा मिळाले रक्त…

149

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट 
घोट गावातील सुरेश गदेकार यांची बहिण रुग्णालयात उपचार घेत असताना तिला पुन्हा एकदा तातडीने रक्ताची आवश्यकता भासली. ही माहिती समजताच समाजसेविका शितलताई भोलुभाऊ सोमनानी आणि त्यांच्या युवा टीमने क्षणाचाही विलंब न करता दवाखान्यात धाव घेत मदतकार्य सुरू केले.

शितलताई सोमनानी यांच्या युवा टीममधील शाहरुख शेख यांनी तातडीने स्वतः रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचवण्यास मोलाचे योगदान दिले. या मानवी सेवा कार्यामुळे घोट-सुभाषग्राम परिसरात समाजकार्याची सकारात्मक चर्चा होत असून समाजात “जीव वाचविणे हीच खरी सेवा” हा संदेश पोहोचत आहे.

शितलताई सोमनानी व त्यांच्या युवा टीमचे कार्य गेल्या काही काळापासून सातत्याने दिसून येत असून गावामध्ये सामाजिक, आरोग्य व आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत करणारा हात म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात प्रतिनिधी म्हणून अशाच कार्यकर्त्यांची गरज असल्याचे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

उपस्थित :
समाजसेविका शितलताई भोलुभाऊ सोमनानी,
शाहरुख शेख (रक्तदाता),
अर्पित दुधबावरे,
संकेत कुनघाडक

Don`t copy text!