Home Breaking News स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याची RPI ची मागणी…

स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याची RPI ची मागणी…

180

प्रतिनिधी गौरव मोहबे

चंद्रपूर (दि. ४ नोव्हेंबर २०२५)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तर्फे स्थानिक रोजगाराला प्राधान्य देण्याची मागणी करणारे निवेदन आज सादर करण्यात आले. या निवेदनात KVR Construction Pvt. Ltd. या कंपनीकडे स्थानिक कामगारांना रोजगार देण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे.

RPI चे जिल्हाध्यक्ष अशोककुमार उमरे यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, माती उत्खनन कंपनीत स्थानिक बेरोजगारांना काम देणे आवश्यक आहे. कंपनीने स्थानिकांना वगळून बाहेरील मजूर नेमल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

पक्षाने स्पष्ट केले आहे की, “स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

या निवेदनाची प्रत माननीय पालकमंत्री, चंद्रपूर यांनाही पाठवण्यात आली आहे.

Don`t copy text!