Home Breaking News डॉ. मनोहर चौधरी यांची प्राचार्यपदी नियुक्ती…

डॉ. मनोहर चौधरी यांची प्राचार्यपदी नियुक्ती…

110

तालुका प्रतिनिधी संकेत कायरकर वरोरा

वरोरा:
आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा येथील वाणिज्य विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. मनोहर चौधरी यांची राजे धर्मराव कला, वाणिज्य महाविद्यालय, मूलचेरा (जि. गडचिरोली) येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे.

डॉ. चौधरी यांनी २००९ पासून वरोरा महाविद्यालयात अध्यापन करत उल्लेखनीय कार्य केले आहे. संशोधन, विद्यार्थ्यांशी सुसंवाद व सामाजिक सहभाग यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी आपल्या कार्यालयात डॉ. मनोहर चौधरी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. या वेळी डॉ. काळे यांनी त्यांच्याबद्दल शुभेच्छा स्वरूपात दोन शब्द व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमावेळी मुख्य लिपिक देवानंद अलोने, वरिष्ठ लिपिक कमलाकर डुकरे, तसेच कार्यालयीन कर्मचारी संतोष गुंतीवार, चेतन नागदेवते, निखिल डुकरे, संकेत कायरकर, प्रज्वल टेप्पलवार, धम्मदीप दरडे आणि शिपाई नागोभाऊ डेंगळे उपस्थित होते.

या नियुक्तीमुळे वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयाचा गौरव वाढला असून सर्व स्तरातून डॉ. मनोहर चौधरी सरांना प्राचार्यपदाच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Don`t copy text!