Home Breaking News हळदवाही रेगडी जि. प. क्षेत्रात भाजप बंगाली आघाडी सुरेश शाहा यांचा अफलातून...

हळदवाही रेगडी जि. प. क्षेत्रात भाजप बंगाली आघाडी सुरेश शाहा यांचा अफलातून दौरा…

96

जिल्हा संपादक नितेश खडसे

एकच नारा एकच नारा सुरेश भाऊ हमारा सुरेश भाऊ हमारा घोषणा देत नागरिकांचे प्रतिसाद

हळदवाही रेगडी जि. प. क्षेत्रात भाजप बंगाली आघाडी सुरेश शहा यांचा अफलातून दौरा

दिवाळी व भाऊबीज निमित्त विविध गावात भेट दिली असता प्रचंड जनतेचा उत्साह दिसून आला मागील अनेक वर्षानंतर या क्षेत्रात सर्वसाधारण सीट निघाल्याने सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या असून स्थानिक क्षेत्राचा माणूस निवडून आला पाहिजे अशी भावना सर्वांन कडून व्यक्त केली जात आहे.

1999 पासून भारतीय जनता पार्टीचा सेवक मनून काम करत असताना अनेक विकासाचे कामे तसेच स्थानिक जनतेचे समस्या पोटतिडकीने सोडवण्याचे काम आपण केलेले आहे तसेच रेगडी सारख्या गावात मागील दहा वर्षांपासून जनसंपर्क कार्यालय खोलून जनतेचे काम सतत करत असून या कार्यालयातून अनेक लोकांचे समस्या चे निराकरण करण्यात आलेले आहे त्यामुळे यावेळी जनता आपल्या सोबत असून जनतेचा संपूर्ण पाठिंबा आपल्या सोबत आहे.

Don`t copy text!