धान व मक्का पिकांचे झाले मोठया प्रमाणत नुकसान
नुकसान भरपाईची मागणी
प्रतिनिधी गौरव बुरांडे
चामोर्शी तालुक्यातील घोट रेगडी परीसरात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहे.सध्या धान पिक कापणीवर आले आहे जिकडे तिकडे धान कापणीचा हंगाम सुरु झाला आहे.

हातातोंडाशी पिक आले असतानाच शनिवारी संध्याकाळी मुसळधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे कापलेले धान पाण्यात पूर्णपणे भिजले व उभे असलेले धान पीक आडवे झाले व पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर डोक्यावर हात ठेवण्याची पाळी आली असून समोर जगायचे कसे अंगावर असलेला ट्रॅक्टर खर्च,खताची उधारी कर्ज कसा भरावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेगडी परीसरात मोठ्या प्रमाणावर धान व मक्का पीक घेतले जाते त्यामुळे अवकाळी पाऊसाचा फटका धान व मक्का पिकालाही झाला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या धान व मक्का पिकांची नुकसान बघता त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी रेगडी विकासपल्ली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे







