ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई मदत…

56

संपादक :-प्रशांत बिट्टूरवार

विधिमंडळ पक्षनेते आ. वडेट्टीवार यांच्या पाठपुराव्याला यश – ब्रम्हपुरी, सावली व सिंदेवाही तालुक्याचा समावेश

यंदाचे वर्षी खरीप हंगामात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक पूर्णतः उध्वस्त झाले. अशा आसमानी संकट काळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार कडे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना भरीव आर्थिक मदत देऊन, सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. तसेच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी केलेल्या आग्रही मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार आहे.

राजकारणा सह सामाजिक बांधिलकी जोपासणारा सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांची सर्वदूर ओळख आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, कामगार, मजूर यांच्या समस्यांचे निराकरणासाठी सदैव पाठीशी खंबीर उभे राहणारे विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यंदाचे वर्षी झालेल्या अतिवृष्टीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. व लगेच कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांची दैन्यावस्था बघून सदर मागणी त्यांनी शासन दरबारी रेटून धरल्याने अखेर आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या तीनही तालुक्यांचा अतिवृष्टी व नुकसानग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विधिमंडळ पक्षनेते,आ विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सदर तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मदत मिळणार असून एक कर्तव्यदक्ष,शेतकऱ्यांप्रती सहृदयी लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा याचा प्रत्यय ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आला आहे.