Home Breaking News गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाही सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या आरोपीस अटक…

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाही सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या आरोपीस अटक…

354

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणा-या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक

आरोपीसह सुगंधित तंबाखू मुद्देमाल व चारचाकी वाहन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
एकूण 08 लाख 22 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे

महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणा­यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले आहेत. यावरुन काल दिनांक 09 ऑक्टोंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडून सुगंधित तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणा­या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक 09/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय बातमिदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, इसम नामे ललीत राठी रा. अर्जुनी मोरगाव जि. गडचिरोली हा देसाईगंज हद्दीत आपल्या चारचाकी वाहनाने मोठ¬ा प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणार आहे. सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडसा येथील कन्नमवार वार्डकडे जाणा­या रस्त्यावर आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळ सापळा रचला असता, एक संशयीत ग्रे रंगाची मारोती कंपनीची इको चारचाकी वाहन राज प्रोव्हिजन्स किराणा दुकाणासमोर थांबवून काहीतरी सामान वाहनाच्या आतुन उतरवित असताना दिसून आले. यावरुन पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी धाड टाकली असता, एक अज्ञात इसम पोलीसांना पाहून हातातील चंुगळी वाहनाजवळ सोडून पळून गेला. मात्र वाहन चालक नामे ललीत गोपालदास राठी, वय 41 वर्ष, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया हा पंच व पोलीसांना सदर चारचाकी वाहनाच्या ड्रायव्हर सिटवर बसलेला मिळून आला. यानंतर पोलीसांनी वाहन चालक व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनाच्या मधल्या व मागील सिटवर पांढ­या व पिवळ्या रंगाच्या चंुगळीमध्ये हिरव्या रंगाचे होला हुक्का शिशा तंबाखू व लाल रंगाचे ईगल हुक्का तंबाखू असे लिहीलेले पॅकेट मिळून आले. यावरुन सदर वाहनातून 1) हिरव्या रंगाचे होला हुक्का शिशा तंबाखू असे लिहीलेले 1000 ग्रॅम वजनाचे एकूण 130 पॅकेट एकूण किंमत अंदाजे 1,72,250/- रुपये, 2) लाल रंगाचे ईगल हुक्का तंबाखू असे लिहीलेले 400 ग्रॅम वजनाचे एकूण 154 पॅकेट एकूण किंमत अंदाजे 1,30,900/- रुपये, 3) एक जुनी वापरती ग्रे रंगाची चारचाकी वाहन क्र. एम एच 35 ए डब्लू 3395 किंमत अंदाजे 3,00,000/- रुपये तसेच 4) आरोपी ललीत गोपालदास राठी याचे ताब्यात असलेली एकूण 2,19,600/- रुपये रोख रक्कम असा एकूण 8,22,750/- रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलीसांनी जप्त केला आहे. आरोपी नामे ललीत राठी याचेकडे सदरबाबत सखोल चौकशी केली असता त्याने घटनास्थळावरून पळून जाणारा आरोपी हा राज प्रोव्हिजन्स किरणा दुकाणाचा मालक इंद्रकुमार नागदेवे, रा. वडसा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली असल्याचे त्याने सांगितले तसेच सदरचा अवैध मुद्देमाल हा रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया जि. गोंदिया याच्या मालकीचा असून त्याने विक्री करण्यासाठी सदर मुद्देमाल आपल्याकडे सोपविल्याचे आरोपी ललीत राठी याने सांगितले.

यावरुन सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी (1) ललीत गोपालदास राठी, वय 41 वर्ष, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया (2) रवी मोहनलाल खटवानी, रा. गोंदिया जि. गोंदिया व 3) इंद्रकुमार नागदेवे, रा. वडसा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली यांचेविरुध्द अपराध क्रमांक 518/2025 कलम – 3(5), 275, 274, 223, 123 भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम – 59(त्), 3(1)(न्न्न्न्)(त्ध्),27(3)(ड्ढ),26(2)(त्),26(2)(त्ध्) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी नामे ललीत गोपालदास राठी, वय 41 वर्ष, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया याला काल दिनांक 09 ऑक्टोंबर 2025 रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्रातील फरार आरोपींचा शोध सुरु असून गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. प्रेमकुमार दांडेकर, पोस्टे देसाईगंज हे करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज. जी. यांचे मार्गदर्शनात स्थागुशा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं/राजु पंचफुलीवार व चापोअं/दिपक लोणारे यांनी पार पाडली.

Don`t copy text!