डॉ.उपेन्द्र जी कोठेकर,भाजपा विदर्भ संघटनमंत्री
विदर्भ वर्चुअल बैठक संपन्न
जिल्हा संपादक नितेश खडसे गडचिरोली
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, व शिक्षक मतदार संघातील निवडणुकी बाबत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रभाग निहाय, सविस्तर नियोजन करून प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती व प्रभागाला पदाधिकारी प्रभारी देऊन,पदविधर मतदार निवडणुकी संदर्भात पदवीधर मतदारांची नोंदणी करून घेण्याबाबत सविस्तर नियोजन करून, 13 आॅक्टोंबर ला नागपूर येथील व अमरावती येथील मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस तथा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकांमध्ये सविस्तर प्रेझेंटेशन करा, त्याचप्रमाणे प्रभाग व पंचायत समिती निहाय बैठकाची नियोजन करून त्या बैठका घेण्यास सुरुवात करा असे आव्हान भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर यांनी केले. विदर्भस्तरीय वर्चुअल बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते.ष बैठकीचे समारोप भाजपाचे प्रदेश महामंत्री आमदार रणवीर भाऊ सावरकर यांनी केले यावेळी पदवीधर मतदार संघाच्या संदर्भातील माहिती श्री दिवे साहेब यांनी दिली तर शिक्षक मतदार संघातील माहिती श्री दिणेशजी यांनी यावेळी दिली
13 ऑक्टोबरला होणाऱ्या अमरावती व नागपूर येथील बैठकीला अपेक्षित पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हाने संघटन मंत्री यांनी केले.या बैठकीला विदर्भातील भाजपाचे जिल्हाध्यक्ष महामंत्री व अपेक्षित पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते