गोवंश हत्या करुन मांस विकणाऱ्यांवर भामरागड पोलीसांची कारवाई…

145

तालुका प्रतिनिधी कवीश्वर मोतकुरवार

भामरागड:-

गोवंशाची हत्या करुन मांस विकणाऱ्या दोघांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी मौजा भामरागड संघर्ष नगर येथे केली. आरोपींकडुन ३६.७५ किलो एकुण १८.०००/- रु. किंमतीचा गोवंश मास जप्त केले. संघर्ष नगर भामरागड येथील काही इसम गोवंश हत्या करुन मांस खरेदी विक्रीचे व्यवसाय करत असल्याची गोपनिय माहीती भामरागड पोलीसांना मिळाली पोलीसांनी पशुवैद्यकिय दवाखाण्यातील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आनंदराव कदम यांच्या उपस्थितीत छापा मारुन गोवंश हत्या करुन मांस विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. बाजीराव पकरी वाचामी वय ४० वर्ष व सुखदेव मुरा उसेंडी वय – ४५ वर्ष दोन्ही रा. संघर्ष नगर भामरागड यांचा आरोपी मध्ये समावेश आहे.

भामरागड ठाणे हे नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल मानले जाते. पो.नि. सचिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे, पोलीस उपनिरिक्षक धनश्री सगणे, पोलीस अंमलदार सुमित गायकवाड, प्रफुल चव्हाण, अमोल रासेकर यांनी संघर्ष नगर भामरागड येथे जावुन छापा टाकला. तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज इंगळे करत आहेत.