गोंडपिपरी येथे वार्षिक महिला मेळावा संपन्न…

198

प्रतिनिधी शरद कुकुडकर

गोंडपिपरी:- महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारे लोकसंचलीत साधन केंद्र, माविम द्वारे भव्य महिला मेळावा व 14 वी वार्षिक सभा खैरे कुणबी सभागृहा गोंडपिपरी येथे आयोजित करण्यात आले

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जि प सदस्य मा श्री अमर बोडलावार यांनी उपस्थित महिलांना केंद्र व राज्यस्तरावील शासनाचे विविध ध्येयधोरण संकल्पना बाबतीत माहिती दिली व मार्गदर्शन केले .

उद्घाटन प्रसंगी सह्योग लोकसंचालीत साधन केंद्र चालविण्यासाठी कार्यालय उभारणीसाठी महिलांनी जागेची मागणी केली

यावर मा सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचा मार्गदर्शनात व राजूरा विधानसभाचे आमदार मा देवरावभाऊ भोंगळे यांचा सहकार्याने कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन मा अमर बोडलावार यांनी उपस्थित महिलांना दिली

यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ शालीनीताई कांबळे ,प्रमुख अतिथी म्हणून सौ अमावस्या निमसरकर ,दर्शना दूर्गे, महानंदा नेटे,प्रदीप काठोडे ,गिता केकान,शिरीष सूरजूसे ,स्वाती वडपल्लीवार,श्री सुरेश गोंगले,कल्पना मडावी,उमेद महिला बचत गटाचे असंख्य महिला उपस्थित होते.