डिजिटल मिडिया संघा तर्फे पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांचे स्वागत…

116

प्रतिनिधी नितेश खडसे

चामोर्शी :-
चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक पदी असलेल्या कांदबाने याची नुकतीच बदली झाल्याने यांच्या जागेवर भामरागड पोलिस स्टेशन येथुन बदली होऊन चामोर्शी पोलीस स्टेशन इथे १३ सप्टेंबर ला पोलीस निरीक्षक दिपक डोंब नव्याने रुजू झाले आहे. यांचे स्वागत डिजिटल मिडिया पत्रकार संघा तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांच्याशी डिजिटल मिडिया संघाने चामोर्शी शहरातील समस्या बाबत सविस्तर चर्चा केली असता, चामोर्शी शहरातील समस्या आपण लवकरच दूर करू असे आश्वासन सुद्धा यावेळी पोलीस निरीक्षक दिपक डोंब यांनी डिजिटल मिडिया पत्रकार संघाला व्यक्त केली. यावेळी वैनगंगा न्यूज 24 चे मुख्य संपादक श्रावण वाकोडे, न्यूज जागर चे जिल्हा प्रतिनिधी सोनू वाळके, न्यूज नेशन चे जिल्हा प्रतिनिधी हस्ते भगत, महाराष्ट्रलाईव्ह न्यूज तालुका प्रतिनिधि धनराज वासेकर, नवराष्ट्र निर्माण तालुका प्रतिनिधि मारोती बारसागडे, बुलेटिन न्यूज गडचिरोली चे जिल्हा प्रतिनिधी प्रकाश बन्सोड उपस्थित होते.