गडचिरोलीत महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावणकुळे यांची मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

146

प्रतिनिधी सतीश कुसराम

गडचिरोली (ता. २० सप्टेंबर २०२५) :

राज्याचे महसूल मंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखरजी बावणकुळे यांनी गडचिरोली दौऱ्यादरम्यान आज माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान डॉ. नेते कुटुंबीयांनी मंत्री बावणकुळे यांचे आत्मीयतेने औक्षवंत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री बावणकुळे साहेबांनी परिवारातील सर्वांसोबत आपुलकीने संवाद साधत सुखद क्षण अनुभवले. घरगुती वातावरणात घडलेला हा संवाद अतिशय आनंददायी ठरला.

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, डॉ. नामदेवराव उसेंडी, ओबिसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्रजी ओल्लालवार, की.मो.प्र.सचिव रमेशजी भुरसे,मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा,जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष दतु सुत्रपवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, जेष्ठ नेते गजाननराव येंगदलवार, सुधाकर जी येंगदलवार,माजी सभापती रंजिता कोडाप, लोकसभा समन्वयक डॉ. संगिता (राऊत ) रेवतकर, मुक्तेश्वर काटवे, प्रतिभा चौधरी,सलिम शेख, अँड. विजय चाटे,अर्चना चन्नावार, अर्चना बोरकुटे, कविता उरकुडे, पुनम हेमके,पुष्पा करकाडे, यांच्यासह विवेक बैस, उराडे सर, अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विविध विकासकामे व सामाजिक विषयांवर या भेटीत सविस्तर चर्चा झाली.

ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली असून, पक्षातील एकात्मता आणि कार्यकर्त्यांशी असलेले आत्मीय नाते अधिक दृढ करण्यास ही भेट उपयुक्त ठरल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.