एटापली ते जीवनगट्टा रस्त्याची दुरव्यवस्था वाहनांची असते रात्रंदिवस वर्दळ..
सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल
प्रतिनिधी सतीश कुसराम:
एटापल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणविस आदिवासी बहुल, मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब मध्ये रूपांतर करण्याचे स्वप्न दाखवताना एटापली शहरा पासून हाकेच्या दूरवर असलेल्या जीवनगट्टा रस्त्याची दूरव्यवस्था झालेली असून ह्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. पावसाळ्याच्या तडाख्याने हा मार्ग अक्षरशः खड्डेमय झाला असून, रस्ता ओळखण्यापेक्षा खड्डे मोजणे सोपे झाले आहे. हा रस्ता आता अपघातस्थळ सारखा दिसतोय अशी कल्पना या रस्त्यावरून चालणारे लोक बोलू लागले आहेत. या रस्त्यावरून शालेय मुलं, शेतकरी, आजारी रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिक तसेच अनेक वाहन धावत असतात, प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. पावसामुळे खड्डे पाण्याने भरले असून, कधी कोणत्या क्षणी अपघात होईल याचा अंदाज लागत नाही. अशी बेताची परिस्थिती असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत आहेत. सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्व भक्तजन बाप्पाचे आव्हान करून, विघ्नहर्ता गणरायाचे भक्तिभावाने पूजा अर्चना करीत जीवन सुखकर आणि संकटातून मार्ग काढून सदैव पाठीशी अभे राहावे अशी कामना करीत आहेत. आणि गावातील समस्या बघितले तर प्रचंड, दैनिय आहे. मात्र लोक प्रतिनिधी याकडे मूग गिळून गप्प बसून आहेत. यावर ग्रामस्थ, प्रवासी रोष व्यक्त करीत, थेट सवाल केला आहे की, अपघात होऊन जर एखाद्याचा जीव गेला, तर त्या मृत्यूला जबाबदार कोण?” “कंपनीच्या करोडोंच्या निधीचा वापर नेमका कुठे होतो?” “गावकऱ्यांच्या सुरक्षेला काही किंमत नाही का?” या रस्त्यामुळे गावाकडे जाणे म्हणजे मृत्यूशी खेळण्यासारखे आहे. शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, जर तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर गावातील नागरिक, विद्यार्थी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.







