संपादक प्रशांत बिट्टूरवार
चंद्रपूर:
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तसेच राष्ट्रनेता पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदीजी यांच्या १७ सप्टेंबर या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ०२ ऑक्टोबर या जयंतीदिनापर्यंत देशभरात राबविण्यात येणाऱ्या “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता- सेवा पंधरवडा” अंतर्गत करावयाच्या पूर्वतयारीबाबत तसेच विधानसभा मतदारसंघातील पट्टेवाटप, विविध प्रलंबित विषय आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काल (दि. ११) राजुरा उपविभागीय कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली.

या सप्ताहांतर्गत दि. १७ सप्टेंबर रोजी राजुरा, दि. २२ सप्टेंबर रोजी कोरपना, दि. २३ सप्टेंबर रोजी गोंडपिपरी आणि दि. २४ सप्टेंबर रोजी जिवती तालुक्यात स्थानिक तालुका प्रशासनाकडून भव्य सेवा शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये नागरिकांना सर्व तर्हेच्या योजनांचा लाभ व माहीती, प्रलंबित समस्यांचे निराकरण आणि विविध योजनांमध्ये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना लाभ व प्रमाणपत्रांचे वितरण करण्याच्या सुचना या बैठकीत सर्व अधिकारी व विभागप्रमुखांना दिल्या.
या बैठकीला गोंडपिपरी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती लगीमा तिवारी (भा.प्र.से.), राजुरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गोंड, तहसीलदार रुपाली मोगरकर, तहसीलदार शुभम बहाकर, तहसीलदार पल्लवी आखरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजीवाड, संवर्ग विकास अधिकारी दोडके, संवर्ग विकास अधिकारी पुप्पलवार, श्री. होळकर, मुख्याधिकारी आशिष चव्हाण, मुख्याधिकारी येमाजी धुमाळ, मुख्याधिकारी विवेक चौधरी, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, सुनील गाडे, शिवाजी कदम, श्री. हत्तीगोटे, वनपरिक्षत्रेधिकारी गजानन इंगळे, श्री. लंगडे, श्री. गौरकर, सहाय्यक कामगार आयुक्त श्री. कावळे यांचेसह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.







