गोंडपिपरी येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन… 

242

सहसंपादक श्याम मशाखेत्री

 

गोंडपिपरी (ता.प्र) :– महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता हे विधेयक तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन गोंडपिपरी येथील 

महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार), शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध तथा धरणे आंदोलन करण्यात आले. 

         यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेश कवठे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडूरवार 

काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू झाडे, तुकारामभाऊ झाडे,अशोक रेचनकर, शंभूजी येलेकर, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष विपिन पेदुलवार,अनु जाती विभाग तालुका अध्यक्ष गौतम झाडे,अजयभाऊ माडुरवार ,विनोद नागपुरे,नामदेव सांगळे, संतोष बंडावार, राजु राऊत,अमित फरकडे, रामदास ठाकरे,धीरेंद्र नागापुरे,कडूजी कुबडे, नकुल चंद्रगिरीवार, प्रवीण घ्यार,बालाजी चणकापुरे,अमित फरकडे,गणेश कुरवटकर,प्रशांत कोसनकर यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.