राज्य सरकारने घोट व रेगडी भागातील प्रलंबित समस्या सोडवावे….
आज घोट नवेगाव येथे आयोजित जनाआक्रोश आंदोलनात आंदोलनकर्त्यांची एक मुखी मागणी
डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना
प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
दिनांक 10 सप्टेंबर 2025 घोट
चामोशी तालुक्यातील घोट जवळील नवेगाव येथे
राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो ) दिल्ली जिल्हा गडचिरोली तालुका शाखा घोट चे वतीने
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व रस्ते नवीनीकरण करणे तसेच घोट भागातील सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने लक्ष द्यावे गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाने लक्ष वेधावे यासाठी विराट जनआक्रोश आंदोलन आज संपन्न झाले, या आंदोलनाचे नेतृत्व
डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना डॉ, भारत खटी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, ग्यानेंद्र विस्वास, राष्ट्रीय प्रवक्ता मानवाधिकार संघटन ,
प्रमुख वक्ता.. प्रकाश गेडाम, रेखाताई डोळस, उपस्थित होते,
प्रमुख अतिथी -अशोक पोरेड्डीवार, नामदेव सोनटक्के, अनिता रॉय,जाहेदा शेख, अनिता मडावी उपस्थित होते उपस्थित यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रणय खुणे, प्रमुख वक्ता -प्रकाश भाऊ गेडाम रेखाताई डोळस ,व अशोक पोरेड्डीवार, नामदेव सोनटक्के,जाहेदा शेख, स्नेहा मेश्राम, यांनी मार्गदर्शन केले
आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली, कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी केले, आभार जिल्हा उपाध्यक्ष अनुभव उपाध्ये यांनी मानले यावेळी आंदोलनातील प्रमुख मागण्या 1), घोट रेगडी भागातील 14 गावातील नागरिकांना सिंचनाकरिता पाण्याची सोय झाली पाहिजे
2)अतिक्रमण जमिनीचे पट्टे तात्काळ मिळाले पाहिजे
3) घोट तालुक्याची निर्मिती झाली पाहिजे,
4)साखरदेव देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे,
5) मुतनूर व कोठरी पर्यटन स्थळाचा विकास करणे
6)घोट भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, या करिता शासनाने घोट भागात उद्योग उभरावे ,
7)चामोर्शी मूल मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे,
8)गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील विविध रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे,
9)पोहर नदी वरील पुलिया जवळ रस्ता दुरुस्ती करणे
10)सुरजागड व कोणसरी येथील लॉयड मेटल कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे,
11) दिना धरणाची उंची वाढवणे व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी धरणाची खोलीकरण करणे,
12)चामोर्शी तालुक्यात दारूबंदी हा विषय कडक करणे,
13) मछली चापलवाडा बस सुरू करणे,
14) घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे
15) दिना धरन परिसर सौंदर्यीकरण करणे,
16) घोट नवेगाव मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे ,
17) चामोर्शी येथे एमआयडीसी निर्माण करणे
18) घोट मार्ग ते जिल्हा परिषद शाळेपर्यंत रस्ता तात्काळ दुरुस्त करणे,व समस्या
जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध समस्यांचे तात्काळ निराकरण करणे व राज्य शासनाने घोट क्षेत्रातील विविध समस्या कडे लक्ष दयावे याकरिता विराट जनआंदोलन आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोज बुधवार ला आयोजित करण्यात आले घोट परिसरातील शेकडो नागरिकांनी या जनआंदोलनात मोठया संख्येने सहभाग घेतला
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मानवाधिकार संघटना
जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, आसिफ सैय्यद, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत शहा, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये किशोर कुंडू, गडचिरोली तालुकाध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, गडचिरोली तालुका सचिव दीपक सातपुते, चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे, महिला आघाडी अध्यक्ष विशाखा सिंह महेंद्र मडावी, दिनेश मुजुमदार, किशोर देवतळे , शरीफ शेख, लीना विस्वास, मेघा कुमरे, जितेन शहा, राकेश शेमले, सचिन साखरकर, प्रियंका शेमले, सुमन नेवारे, भोलू पठाण, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले







