चंद्रपूर जिल्हापरिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलंबित..
सहसंपादक श्याम मशाखेत्री
चंद्रपूर: कामाची परवानगी नसतांना वर्क ऑर्डर दिल्याचा ठपका.मागील अडीच महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी धारेवर धरल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.आम आदमी पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही दिवसा आधी पैसे घेतानाचा व्हिडिओ वायरल केला होता.या व्हिडिओ मुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली होती.परवानगी नसतानाही काही कामाची वर्क ऑर्डर दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता.दरम्यान कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित करून शासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला आहे.विवेक पेंढे हे रुजू झाल्यापासून वादग्रस्त ठरले आहे.अडीच महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती.या बैठकीत आमदारांनी पेंढे यांच्या कार्यप्रणालीवर चांगलीच आगपाखड केली होती.सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आमदारांनी लावून धरल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निलंबित करून प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.त्यामुळे निलंबन काळामध्ये ते सेवानिवृत्त होणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू आहे.







