वरोरा शहरात खून….आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

123

वरोरा : वादातून तरुणाची चाकूच्या वाराने हत्या

प्रतिनिधी संकेत कायरकर

वरोरा, ता. ८ : वरोऱ्यातील केसरी नंदन गणपती मंदिराजवळ रविवारी रात्री झालेल्या वादातून नितीन चुटे या तरुणाची चाकूच्या वाराने हत्या झाली.

आरोपी अमोल नवघरे (३५, रा. हनुमान वॉर्ड) याने धारदार शस्त्राने सलग वार करून नितीनला गंभीर जखमी केले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ही घटना रात्री साडेआठ वाजता घडली. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी वणी रोडवर आरोपीस ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. भस्मे, पो.का. सोनोने, नवघरे व प्रशांत नागोसे यांनी केली.