चंद्रपूर जिल्हा एकाच दिवशी अनेक ठिकाणी मृत्यूचा तांडव….

144

सहसंपादक श्याम मशाखेत्री:

चंद्रपूर: ब्रम्हपुरी शहरातील गांधीनगर भागातील मयुर खरवडे या 35 वर्षीय युवकाने शनिवार 7 सप्टेंबर दुपारी कर्जाच्या तणावामुळे गोसेखुर्द कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता त्याचा मृतदेह सावली तालुक्यातील पात्री गावाजवळ कालव्यात आढळून आला. मयुर खरवडे हे शनिवारी दुपारी बारा वाजता बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल केला होता..

 

वेगवेगळ्या घटनात तिघांचा मृत्यू…
चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील तळोधी नाईक गावात शनिवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे.मृतकांमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. तळोधी नाईक येथील रामदास नेवारे याचा बाजारासाठी जात असताना चिमूर तळोधी मार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर रात्री उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला.