मुख्य संपादक प्रशांत शाहा
येणापूर:
परिसरात दिनांक 4 सप्टेंबर 2025 पासून बी.एस.एन.एल. (BSNL) मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प झाली असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नेटवर्क बंद झाल्याने मोबाईल कॉल्स, इंटरनेट वापर, ऑनलाईन पेमेंट्स आणि डिजिटल व्यवहार करण्याकरिता नागरिकांना सामना करावा लागत आहे.
सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना नातेवाईकांशी संपर्क साधणेही कठीण झाले आहे, नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास बरीच अडचणीचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक तातडीच्या सेवांसाठी फोन व इंटरनेटचा वापर करता न आल्याने अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “BSNL नेटवर्क सेवा सतत खंडित होत असल्यामुळे नेहमीच त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी BSNL प्रशासनास तातडीने सेवा सुरळीत करून सातत्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.







