भंगाराम तळोधीत आगीचा भडका- लाखोंचे साहित्य जळून खाक…

749

लाईनमनच्या तत्परतेने टळली दुर्घटना

प्रतिनिधी शरद कुकुडकर

गोंडपिपरी: –

गोंडपिपरी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भंगाराम तळोधीतील उमेश जानकिराम मोहूरले यांच्या घरी देवासमोर लावलेल्या दिव्याच्या जळती वात उंदराने पळविले व घरात आगीचा भडका उडाला. दि.(३) बुधवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान मोहुरले यांनी देवासमोर दिवा लाऊन गणेश मंडळाकडे गेले असता.उंदराने जळती वात पळविल्याने घरात आगीचा भडका उडाला.आगीने भीषण रूप धारण केले आगीमध्ये टीव्ही,टेबल,फॅन, लाकडी बेड,55 हजार रुपये रोख रक्कम,16 ग्रॅम सोने, कपडे व दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य जळून भस्मसात झाले.भीषण आगीत लाखोंची नुकसान झाली.ग्राम पंचायत सदस्य जयेश कारपेनवार यांनी घटनेची माहिती ठाणेदार रमेश हत्तीगोटे,तहसीलदार शुभम बहाकर यांना दिली.घटनास्थळी कृष्णा रॉय,अनुप निकोरे पोलीस दाखल झाले.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका प्रशासणाने अग्निशामक दलाचे वाहन पाठविले मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात दोन दिवसापूर्वी पाऊस आल्याने जागोजागी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवलेले वाहन हे चिखलात फसले.त्यामुळे पोंभुर्णा नगरपंचायतीचे वाहन बोलवण्यात आले मात्र ते वाहन रात्र उशिरा साडेदहा वाजता पोहोचले.वाहन पोहचे पर्यंत आगीवर गावकऱ्यांनी नियंत्रण मिळवले होते.

घरात आगीचा भडका उडाल्यानंतर सिलेंडरचा स्फोट होऊ नये यासाठी लाईनमन सचिन पिंपळशेंडे यांनी जीव धोक्यात टाकून सिलेंडर बाहेर काढला त्यामुळे स्पोट होता होता वाचला व मोठी दुर्घटना होणारी टळली.