लखमापूर बोरी ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा…

130

प्रतिनिधी सतीश कुसराम:

चामोर्शी:
तंमुस अध्यक्ष पदी प्रफुल बारसागडे यांची निवड.
दोन अज्ञात रेडे ग्रामपंचायत च्या ताब्यात, पोलीस स्टेशन, सोशल मीडिया व ग्रामसभेच्या माध्यमातून मूळ मालकास रेडे मिळवून देण्याचे आवाहन.
लखमापूर बोरी :-
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत लखमापूर बोरी इथे माजी सरपंच संजय दूधबळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आले असून अखेर मध्ये महात्मा गांधी तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदासाठी उपस्थित मतदाराच्या हजेरी मध्ये निवडणूक पार पाडून तंमुस समिती पुनर्गठन करण्यात आली.
ग्रामपंचायत अधिकारी आर. व्ही. कुळसंगे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी ग्रामसभेत माहिती दिली व ग्रामस्तरीय समिती ची स्थापना केली. प्राधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर असलेले काही घरकुल ला सुरुवात झालेली नसल्याने ते विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्याकडून हमीपत्र लिहून घेण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. तसेच मनरेगा योजना सन 2026-2027 चा वार्षिक कृती आराखडा तयार करून वैयक्तिक व सार्वजनिक कामाची निवड करण्यात आली. तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान बद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच मागील वर्षी ग्रामपंचायत अंतर्गत किरकोळ विक्री कर वसुली ठेकेदाराकडे लिलावाची थकीत रक्कम तीस हजार रु येत्या पंधरा दिवसामध्ये वसुल करण्यासंबंधी सूचना पत्र काढण्यात आले.
गावामध्ये मागील तीन महिन्याअगोदर दोन अज्ञात रेडे/हल्ले वाट भटकट आले व इकडे तिकडे फिरून कोवळ्या धान पऱ्याची नासाडी करू लागल्याने एका शेतकऱ्याने ते दोन रेडे स्वतःच्या घरी बांधून ठेवले व गावात माहिती दिली मात्र त्यांचा मूळ मालक त्यांना शोधत न आल्यामुळे अखेर ते रेडे ग्रामसभेच्या ताब्यात दिल्याने रेडे मूळ मालकाला मिळवून देण्यासाठी ग्रामसभेने पोलीस ठाण्यात माहिती पत्र दिले व सोशल मीडिया वर माहिती टाकली व येत्या 21 दिवसात मूळ मालकाचा पत्ता न लागल्यास त्यांचा लिलाव करून मिळालेल्या रक्कमतून राखणदाराची मजुरी देण्यात येणार व उर्वरित रक्कम ग्रामविकासात वापरण्याचे महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.
ग्रामपंचायत कडून नेहमी तलाठी , ग्रामकृषी अधिकारी, आरोग्य कर्मचारी, वन विभाग व शिक्षकवृंद यांना ग्रामसभेला उपस्थित राहण्याबद्दल चे सूचना पत्र न दिल्याने ते उपस्थित राहत नाही त्यामुळे ग्रामसभेचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने ग्रामस्थानी यावर नाराजी व्यक्त केली
प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी कुळसंगे यांनी केले. ग्रामसभेला सरपंच किरणताई सुरजागडे, उपसरपंच विनोद भोयर, सदस्य अरुण सुरजागडे, गंगाधर वैरागडे, जलमित्र रमेश बोरीकर लिपिक अक्षय नैताम उपस्थित होते, उपस्थितांचे आभार ग्राम रोजगार सेवक साईनाथ कुळमेथे यांनी मानले.