वरोरा शहर प्रतिनिधी संकेत कायरकर
वरोरा:- शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते प्रवेश. जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अभिजीत कुडे यांची ग्रामीण भागात चांगली पकड आहे. नागरी माढेळी भागात त्यांनी नेत्र तपासणी शिबीर, मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबीर, रस्त्यासाठी अनेक आंदोलन करून रस्त्यांचे काम केले. लोकांच्या मनात त्यांची जागा निर्माण केली आहे. अभिजित कुडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. लवकरच सर्व मित्र परिवार यांचा जाहीर प्रवेश होणार आहे.







