प्रतिनिधी/भामरागड
गडचिरोली:
मुसळधार पावसामुळे भामरागड व 112 गावांचा संपर्क तुटलेला असताना,
आरेवाडा येथील अंगणवाडी सेविका सौ. सीमा बांबोळे यांची प्रकृती गंभीर झाली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या माहितीवरून गडचिरोली पोलिसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडला रवाना करण्यात आले
सीमा बांबोळे यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे.
गडचिरोली पोलिसांनी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने ही कारवाई पार पडली.