गोंडपिपरीत भाजप महिला मोर्चाकडून आपला देवाभाऊ-रक्षाबंधन सोहळा.
शरद कुकुडकार
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी, दि. २०
एवढ्या मोठ्या संख्येने आपल्या दादाला राखी बांधायला एकवटलेल्या माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील हा आनंदभाव बघून मला सत्कार्याची उर्जा मिळते. माझी ताकद, माझा उत्साह हे तुम्ही आहात. तुमचा हा दादा कायम तुमच्या पाठीशी राहील ही ग्वाही देतो. अशी भावना आमदार देवराव भोंगळे यांनी लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केली.
भाजपा महिला मोर्चा गोंडपिपरी तालुकाच्या वतीने काल (दि. १९) स्थानिक कन्यका सभागृहात आयोजित केलेल्या आपला देवाभाऊ – रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते.
याठिकाणी जमलेल्या महिला भगिनींनी आमदार देवराव भोंगळे यांसह उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना राखी बांधून सामुहिक रक्षाबंधन साजरा केला.
यावेळी आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, माझ्या लाडक्या बहिणींचं प्रेम पाहून मी अगदी भारावून गेलो आहे. भगिनींनी बांधलेल्या राखीच्या स्वरूपातील निखळ बंधू-प्रेमाची उतराई कधीच होऊ शकत नाही. परंतू त्यांच्या चेहर्यावरचा हा आनंद कायम टिकून रहावा यासाठी बहिणींच्या हक्काचा दादा म्हणून मला जे करता येईल ते करायला मी नेहमी तत्पर असेन. राखीच्या या नाजूक धाग्यात भाऊ-बहिणीच्या नात्याचा अढळ विश्वास, आपुलकी आणि आयुष्यभराच्या साथिचे
सुंदर वचन गुंफलेले असते. आज तीच भावना आपल्या स्नेहपुर्वक रक्षाबंधनातून जाणवत आहे.
पुढे बोलताना, महिला सक्षमीकरणासाठी आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे. आपल्या केंद्र व राज्य सरकारने विशेषतः महिलांकरीता मुलगी जन्माला येताच माझी कन्या भाग्यश्री योजनेपासून तर वृद्धापकाळातील निवृत्तीवेतन योजनेपर्यंत शेकडो लोककल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, या सर्व योजनांची माहिती स्थानिक मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा जनसंपर्क कार्यालय येथून घेऊन त्याचा जास्तीत जास्त बहिणींनी लाभ घ्यावा; असे आवाहन ही मी याप्रसंगी करतो, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात सौ. अर्चना भोंगळे, भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम, जिल्हाध्यक्षा वंदनाताई शेंडे, तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा स्वाती वडपल्लीवार, शहराध्यक्ष ॲड. अरुणा जांभुळकर, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, उपनगराध्यक्षा सारीका मडावी, महामंत्री निलेश पुलगमकर, सतीश वासमवार, कोमल फरकाडे, बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्निल अनमुलवार, बबन निकोडे, दिपक सा. बोनगिरवार, सुहास सा. माडुरवार, निलेश संगमवार, माजी जि. प. सदस्य वैष्णवी बोडलावार, कल्पना अवथरे, नगरसेविका मनिषा दुर्योधन, मनिषा मडावी, शारदा गरपल्लीवार, रंजना रामगिरकर, वनिता देवकते, माया वाघाडे, सुरेखा श्रीकोंडावार, कलावती पुप्पलवार, सुरेखा पिपरे, प्रांजली बोनगिवार, सपना तामगाडगे, जया सातपुते, शुभांगी वनकर, तेजस्विनी भगत, भारती साखलवार, चंद्रकला भोयर, अस्मिता रापलवार, रोशनी अनमूलवार, सुशीला पुलगमकर, वैशाली बोलमवार, प्रवीण ढोडरे , पोचमलू उलेंदला, राकेश साखलवार, मनोज वनकर, शिथिल लोणारे, रमेश दिंगलवार, राजेंद्र गोहणे, गणेश मेरुगवार, पंकज चिलनकर, प्रज्वल बोबाटे, वैभव बोनगीरवार यांचेसह मोठ्या संख्येने तालुक्यातून महिलाभगीनी उपस्थित होत्या.