विदर्भाची काशी मार्कंडा येथे एस.आर.दळवी फाँडेशन तर्फे प्लास्टिकमुक्ती जनजागृती

278

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान हे भगवान शिवाचे लोकप्रसिद्ध देवस्थान केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मिनी खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री ला येथे दुरदुरून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. पण त्यांच्याकडून प्लास्टिकचा अतिवापर केल्या जातो. प्लास्टिकचा वापर तर घातकच पण भाविकांकडून त्याची योग्य विल्हेवाटही लावली जात नाही. म्हणून दि.२६ फेब्रुवारी २०२५ ला महाशिवरात्री निमित्त भरण्यात येणाऱ्या यात्रेदरम्यान एस.आर.दळवी फाऊंडेशन तर्फ जि.प.उ.प्रा.शाळा सिनाळा येथील विद्यार्थ्यांकडून रॅली काढून प्लास्टिक मुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. नदीपात्रालगत सुद्धा बॅनर्स घेऊन घोषवाक्यासह प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. व प्लास्टिक कचरा गोळा केला.

कार्यक्रमाला एस.आर. दळवी फाऊंडेशन जिल्हा अध्यक्ष विजया पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुचरिता काळे, उपाध्यक्ष संदीप कोंडेकर,सहसचिव अंजेलीना साळवे मॅडम, सदस्य ज्योती गावंडे मॅडम, पुष्पा आडे मॅडम,सुधीर झाडे सर, दिपक भोपळे सर व कल्पना बावणे सह जि.प.उच्च प्राथमिक शाळा सिनाळाचे विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले व स्तूत्य उपक्रम म्हणून प्रशंसा केली…एस.आर.दळवी फाऊंडेशन तर्फे असेच सामाजिक उपक्रम राबविले जात असून शिक्षण व पर्यावरणावर भर देण्यात येतो. यापुढेही आम्ही प्लास्टिक मुक्ती साठी सातत्याने पाठपुरावा करत राहू असे प्रतिपादन सुचरिता काळे यांनी व्यक्त केले.