सकमुर(चेकबापूर) गावातील विविध समस्यांबाबत आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन

319

गोंडपिपरी: सकमुर(चेकबापूर) गावातील विविध समस्यांबाबत आमदार देवराव भोंगळे यांना निवेदन

गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर(चेकबापूर) गावातील विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांना नुकतेच निवेदन दिले. या निवेदनात गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या, ब्रेकर बसवण्याची आवश्यकता, तसेच गावात नवीन पाईप लाईन व जल शुध्दीकरण मशीन बसवण्याची मागणी करण्यात आली.

निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य संतोष मुलगवार आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ दहागावकर उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांनी या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

गावातील पाणी पुरवठा आणि रस्त्यांवर असलेल्या अडचणींमुळे गाववासीयांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे गावातील जीवनमान सुधारण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेत सबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारा संपर्क करून समस्या सोडविण्याच्या सुचना दिल्या.