आनंद निकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूना शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कास्य पदक

156

वरोरा: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत दि. २६ ते २८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान जिल्हा क्रिडा संकुल, अकोला येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये आनंद निकेतन विद्यालयात वर्ग १२ वी ला शिकत असलेली कु. दक्षता मिलमिले व प्रणय चंद्रभान खेरे या दोन्ही खेळाडुंनी १९ वर्षाखालील वयोगटात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करत कास्य पदक प्राप्त केले.या दोन्ही खेळाडूंनी जिद्द आणि चिकाटीने मेहनत केली आणि आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत पदक प्राप्त केले. त्यांच्या या विजयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय प्रशिक्षक पंकज शेंडे तसेच मार्गदर्शक प्रा.तानाजी बायस्कर यांना दिले.

महारोगी सेवा समिती वरोरा चे सचिव डॉ. विकास आमटे, विश्वस्त श्री कौस्तुभ आमटे, अंतर्गत व्यवस्थापक सौ पल्लवी आमटे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, उपप्राचार्य प्रा.राधा सवाने,शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.तानाजी बायस्कर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.