एस. आर. एम.समाजकार्य महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा.नरेंद्र टिकले यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न…

258

स्थानिक एस.आर. एम. समाजकार्य महाविद्यालय, पडोली येथे कार्यरत उपप्राचार्य प्रा.नरेंद्र टिकले यांचा सेवानिवृत्ती सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रांगणात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्यामध्ये विद्यार्थी ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपप्राचार्य प्रा.नरेंद्र टिकले यांची कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे सहसचिव व गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू 

डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री कापसे , डॉ.संजीव निंबाळकर अधिष्ठाता, गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली, श्री.श्याम धोपटे, डॉ. एल. व्ही.शेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी प्रा.नरेंद्र टिकले यांच्या बद्दल महाविद्यालयाचा एक आधारस्तंभ तसेच त्यांच्या निष्ठा, ज्ञान, आणि शिक्षणाच्या प्रति असलेल्या अपार प्रेमामुळे असंख्य विद्यार्थी आणि सहकारी प्रेरित झाल्याचे सांगितले. व त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विशेष उपस्थिती लाभलेले एस. पी. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ एल. व्ही. शेंडे, प्राचार्य डॉ जयश्री कापसे,श्री श्याम धोपटे, माजी प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, 

डॉ विद्याधर बनसोड ,उपप्राचार्य नरेंद्र टिकले यांच्या पत्नी सौ. उर्मिला टिकले तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना प्रा.श्री नरेंद्र टिकले यांनी शिक्षक म्हणून माझ्या प्रवासात, मी नेहमीच विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. मला आजही आठवतंय, जेव्हा मी पहिल्यांदा या महाविद्यालयात आलो होतो, तेव्हा मनात खूप स्वप्नं आणि संकल्प होते. त्या स्वप्नांना आणि संकल्पांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी माझ्या सर्व सामर्थ्याने प्रयत्न केले.

आपल्या सहकार्यांमुळे आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यातूनच मी हे सर्व काही साध्य करू शकलो. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्या समस्यांचे समाधान करणे, आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणे हेच माझं कर्तव्य होतं, आणि ते मी आनंदाने पार पाडलं.

आज या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी, मला आपल्या सर्वांचा अभिमान आहे. आपण सर्वांनी मला ज्या प्रकारे सहकार्य केले, त्यासाठी मी आभारी आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि सन्मान नेहमीच माझ्या मनात राहील.

कार्यक्रमाचे संचालन प्रा विश्वनाथ राठोड तर आभार प्रदर्शन डॉ किरणकुमार मनुरे यांनी केले. कार्यक्रमांमध्ये उपस्थित प्रा. टिकले सरांचे स्नेही मित्रपरिवार मध्ये डॉ. संजय बेले डॉ. नामदेव वरभे, र्डॉ. दिलीप चौधरी, प्राचार्य डॉ.विलास ढोणे व शहरातील मान्यवर पाहुणे, प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता…