Home चंद्रपूर सावली वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला… बोथली येथील घटना, जखमीत...

वटवृक्षाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाशांचा हल्ला… बोथली येथील घटना, जखमीत ४ महिला १ मुलाचा समावेश

802

सावली : वट पौर्णिमे निमित्त वट वृक्षाची पुजा करताना मधमाशांनी केलेल्या हल्यात चार महिला व एक मुलगा जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार दि. २१ जूनला सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

ज्योति स्वामी येदनुवार (५०), सपना राकेश पत्तिवार (३२), माया प्रकाश चेल्लीम्यालवार (६६), श्वेतासंदीप चेल्ली म्यालवार (२५), रक्ष राकेश पत्तिवार (१२) असे जखमी झालेल्याची नावे असून ते बोथली येथील रहिवाशी होते. वट सावित्रीच्या निमित्याने वट वृक्षाची पूजा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात या उत्साहाचे महत्व आहे.

शुक्रवार रोजी दरवर्षी प्रमाणे बोथलीपरिसरातील काही महिला बोथली-हिरपुर मार्गे तलाठी ऑफिस लगत असलेल्या वटवृक्षाच्या झाडात पुजा करीत असताना त्या झाडालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर काही मधमाशांच्या पोळयाचे वास्तव्य होते. शुक्रवारी सकाळी १० वाजता च्या सुमारापासून वटवृक्षाची पूजा सुरु झाली.

दरम्यान झाडालगत पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाशांच्या समुहाने पूजा करणाऱ्या महिलांवर हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे भयभीत महिलांनी वटवृक्षापासून पूजा न करता पळ काढला आणि घराचा रस्ता धरला.

Don`t copy text!