Home गोंडपीपरी भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू

भाजपचे युवा कार्यकर्ते नाना येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू

1474

गोंडपिपरी :-लोकसभा निवडणुकीची धामाधुम सुरू आहे.अशात आज एक दुखद घटना समोर आली आहे.गोंडपिपरी तालुका भाजपचे झुंजार कार्यकर्ते,भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नाना येल्लेवार वय ४० यांचा राजूरा येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती कळताच अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राजु-याकडे धाव घेतली.२दिवसापुर्वी नाना येल्लेवार पक्षाच्या उपक्रमासाठी राजूरा येथे गेले होते.आज त्यांच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम होता.दरम्यान सम्राट लाॅनकडे बाईकने जात असतांना झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.येल्लेवार हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते पक्षासाठी आपल्या जिवाचे रान करणारे येल्लेवार सर्वसामान्यांच्या कामासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व होते.येल्लेवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समजताच गोंडपिपरी तालुक्यात शोककळा पसरली.पक्षाच्या नेत्यांनी व मित्रपरिवारांनी राजु-याकडे धाव घेतली.नाना येल्लेवार यांच्या पश्चात त्यांचा मोठा आप्तपरिवार आहे.एका चांगल्या कार्यकर्त्यांच्या अशा अनपेक्षित मृत्यूने गोंडपिपरी तालुक्यात शोक व्यक्त केला जात आहे.

Don`t copy text!