शिवानी वडेट्टीवार यांची ” इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना सदिच्छा भेटआघाडी धोरणावर विचार मंथन – ज्येष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद…

549

देशाची महत्त्वपूर्ण निवडणूक असलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर देशाला महागाई बेरोजगारी व गुलामगिरीच्या खाईत लोटो पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून पायउतार करणे हेतू युवकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. राज्यातील युवकांना आगामी निवडणुकीतील करावयाचे कार्य यासंबंधी मार्गदर्शन जाणून घेणे हेतू युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना सदिच्छा भेट देऊन त्यांची योग्य मार्गदर्शन व आगामी निवडणुकीत युवकांच्या भूमिकेबाबत सकारात्मक चर्चा केली.

युवाशक्ती ही भारत देशाची सर्वात मोठी शक्ती व भविष्य आहे. मात्र सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांनी धर्मांधतेच्या व अतिशोक्ती स्वप्नांच्या राजकारणातून संपूर्ण युवा पिढीला दिशाहीन करण्याचे काम केले आहे. यामुळे सत्तेतील पुढाऱ्यांनी जनतेचे कुठलेही हित न जोपासता केवळ उद्योगपतींची तिजोरी भरणारे हवे ते निर्णय घेऊन देशाला महागाई, बेरोजगारी व गुलामगिरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. देशातील या बिकट व विपरीत परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, युवक, ज्येष्ठ नागरिक, पूर्णतः झळा सोसत जीवन व्यथित करीत असल्याचे विदारक चित्र उभे ठाकले आहे. अशा भयावह स्थितीत पक्षांतर्गत फूट पाडून सत्ता काबीज करणाऱ्या सत्तालोभी हुकूमशाही विरोधात देशातील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यासह देशातील अन्य समविचारी घटक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जी संविधान रुपी अमूल्य भेट दिली त्या संविधानाला समोर नष्ट करू पाहणाऱ्या मनुस्मृतिवाद्यांना सत्तेतून हद्दपार करण्या हेतू देश स्तरावर इंडिया आघाडीने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दशकापासून युवकांच्या गळ्यातले ताईत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युथ आयकॉन, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी इंडिया आघाडीचे ध्येय धोरण युवकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघडीतील घटक पक्षांचे नेते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत व ज्येष्ठ यांचे कडून युवा कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन मिळवणे हेतू सदिच्छा भेट घेत इंडिया आघाडीच्या धोरणाची व देशाला हुकूमशाही व आगामी काळात संभाव्य अशा गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त करणे हेतू मुळे रुजविण्याची कार्य धडाडीने केले आहे. आज युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी इंडिया आघाडीतील महत्त्वपूर्ण घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), रीपाई, यांच्या प्रमुख नेत्यांची सदिच्छा भेट घेत सकारात्मक चर्चा केली. या सकारात्मक चर्चेला इंडिया आघाड्यातील घटक पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्तम असा प्रतिसाद देत युवा प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या कार्याचे कौतुकही केले. आगामी लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीसाठी ही जमेची बाजू असून पक्षाच्या ध्येयधोरण तळागाळापर्यंत कसे पोहोचवावे हे याचे उत्तम उदाहरण आहे.