Homeचंद्रपूरछत्रपती शिवरायांच्या कार्याची महती विश्वव्यापी - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती विश्वव्यापी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार…

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजनांचे व रयतेचे राजे होते. आपल्या राज्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला व प्रजेतील प्रत्येक व्यक्तीच्या व्यथा जाणणारे सहहृदयी व समान न्याय देणारे कर्तव्यनिष्ठ थोर नायक होते. अश्या शिवरायांचा इतिहास जगातील शंभराहून अधिक देशातील विद्यापीठात शिकविल्या जात असून छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती ही विश्वव्यापी आहे.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली जिल्ह्यातील मुरमाडी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.

गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी या छोट्याश्या गावी संपूर्ण ग्राम वासियांकडून दरवर्षी शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदाचे वर्षी शिवजयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अध्यक्ष म्हणून गडचिरोली शिवसेनेचे नेते अरविंद कात्रटवार, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, ॲड. राम मेश्राम, डॉ. नितीन कोडवते, माजी जिल्हा अध्यक्ष हसन गिलानी, प्रभाकर वासेकर, विश्वजित कोवासे, मोटघरे,अतुल मल्लेलवार, संदीप भुरसे, यादव लोहांबरे, गावतुरे, बनपुरकर यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात तीनही बाजूने विरोधकांनी वेढा घातला असताना आपल्या प्राणाची बाजी पणाला लावून सुराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोकड्या मावळ्यांना घेवुन आपल्या पराक्रम वृत्तीने शत्रूंवर विजय मिळवला.पर स्त्री माते समान महिला मानून त्यांची अब्रू लुटणाऱ्यांचे हात पाय छाटले. राज्यातील प्रजेच्या हिताचे निर्णय घेणे व प्रजेसाठी लोकशाही राज्य चालविणे हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला.

मात्र सध्या देशात व राज्यात लोकशाहीला व लोकशाहीची नीतिमूल्ये रुजविनाऱ्या संविधानाला समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न चालविले जात आहे. तर राज्यात स्त्री संरक्षण कायद्याचे मनोविकृतांकडून धिंडवडे काढले जात असताना शासन अपयशी ठरत आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढत असून यात जनता होरपळली जात आहे. केवळ धर्मांधता पसरवून जनतेची दिशाभूल केली जाते. अश्या धर्मांधतेला बळी न पडता शिक्षण व गाव एकोप्याने भविष्य घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोबतच मुरमाडी येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभारणार असेही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. या नंतर गावातील शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुण तरुणीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

आंबेशिवणी, राजगाटा व चुरमुरा येथे शिवजयंती कार्यक्रमात सहभाग

गडचिरोली तालुक्यातील आंबे शिवणी येथे शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित होऊन उपस्थित गावकरिंना मार्गदर्शन केले.तर राजगाटा येथे ग्राम विकास फाऊंडेशन तर्फे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. सोबतच शिवजयंती कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्द व त्यांनी रयतेसाठीकेलेल्या महान कार्याची इतिहासाची महती आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!