Home चंद्रपूर राजुरा इन्फंट येथे मोटिव्हेशनल स्पिकर सोनिया जडाजी यांचे मार्गदर्शन.

इन्फंट येथे मोटिव्हेशनल स्पिकर सोनिया जडाजी यांचे मार्गदर्शन.

447

राजुरा (ता. प्र) :–इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे इंटरनॅशनल मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सोनिया जडाजी यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनिया जडाजी यांनी विद्यार्थी आणि पालकांना सकारात्मक विचार, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांचा सहभाग, विद्यार्थ्यांमधे होणारे सकारात्मक बदल, व्यक्तिमत्त्व विकास, चाणक्य नीति, एकाग्रतेचा विकास, अभ्यासात अभिरुचीची आवश्यकता, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, मोबाईलचे अतिवापर टाळणे इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर विविध उदाहरण व अनुभवातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे होते तर प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बिलकिस शेख यांनी तर आभार प्रदर्शन ममता पूरटकर यांनी केले.

Don`t copy text!