चंद्रपूरचे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी जिल्ह्यात बदली झाली असून, त्यांच्या जागी नवे पोलिस अधीक्षक म्हणून मुमक्का सुदर्शन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूकांच्या अगोदर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.गृह विभागाने बुधवारी आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. यामध्ये नागपूरच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. सुदर्शन हे तरुण व तडफदार पोलीस अधिकारी म्हणून ओळखण्यात येतात.







