चंद्रपूर: प्रजासत्ताक दिना निमित्त्य ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या विचारांना आदर्श ठेऊन स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्थान चंद्रपूर जिल्ह्याच्या माध्यमातून छत्रपती नगर, तुकुम परीसर येथे वृषारोपण राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी छत्रपती नगर परीसरात झाडे लावुन श्रमदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निशिकांत आष्टनकर, शहर प्रमुख अपेक्षा भालेराव, तालुका प्रमुख रोशन आस्टुनकर, शहर उपप्रमुख सागर देव, पर्यावरण प्रमुख अभिषेक गुज्जनवार, अंकित पांडे, नुरी शेख व परिसरातील सामान्य नागरीक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या अभियान बद्दल कौतुक व्यक्त केले.







