Homeचंद्रपूरग्रामखेड्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास.- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अड्याळ येथे...

ग्रामखेड्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास.- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अड्याळ येथे ग्रामपंचायत भवनाचा लोकार्पण सोहळा

गावगाड्याच्या विकासाचा कारभार जिथून हाकल्या जातो त्या ग्रामपंचायतीची इमारत ही प्रशस्त असायला हवी. ग्रामखेड्यांवरच देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. ग्रामखेड्यांचा विकास म्हणजेच देशाचा सर्वांगीण विकास असुन नागरिकांच्या मुलभूत सोयीसुविधांना प्राधान्यक्रमाने ग्रामस्तरावर सोडवाव्या. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ जाणी येथील ग्रामपंचायतीच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हसन गिलानी, गटविकास अधिकारी संजय पुरी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डी.के.मेश्राम, तुंडुलवार गुरूजी, सरपंच ताराबाई गाडेकर, उपसरपंच नामदेव लांजेवार, ग्रा.पं.सदस्य सुचिता नवघडे, श्वेता भोयर, विनोद वासनिक, आदिवासी टायगर सेना अध्यक्ष मोरेश्वर उईके, प्रा.स्निग्धा कांबळे, पं.स.विस्तार अधिकारी जयेंद्र राऊत, ग्रामसेवक भोयर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पूढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, सण, उत्सव व विविध क्रीडा स्पर्धा यातून गावाच्या एकोप्याचे दर्शन घडते. अड्याळ गावपरिसरात आपण ३ उपसा सिंचन योजना (अंदाजित किंमत १.७५ कोटी) मंजूर करून घेत त्याच्या निवीदा काढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळावे त्यातुन त्यांनी उत्तम शेती करत आपली प्रगती साधावी यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. उपसा सिंचन योजना कार्यान्वित होताच मोठी सिंचन क्रांती घडणार असुन सोबतच अड्याळ टेकडी लगत विदर्भातील सर्वांत मोठे विपश्यना केंद्र उभारण्यात येत आहे. अड्याळ येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार महिला बचत गटासाठी १० लाख रुपयांचा निधी, स्मशानभूमीत शोकसभा भवन, खुली व्यायामशाळा, गाव प्रवेशद्वार, गाव तलावाचे सुशोभीकरण, अड्याळ जाणी ते गाव फाटा पोचमार्ग इत्यादी कामे लवकरच पुर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातव यांनी तर प्रास्ताविक उपसरपंच नामदेव लांजेवार यांनी केले. तर आभारप्रदर्शन ग्रामसेवक भोयर यांनी मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!