Homeगोंडपीपरीआ. सुभाष धोटेंच्या हस्ते वेजगाव व सरांडी येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन...

आ. सुभाष धोटेंच्या हस्ते वेजगाव व सरांडी येथे रस्ता बांधकामाचे भूमिपूजन…

गोंडपीपरी (ता. प्र) :– सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. – २ चंद्रपूर २५१५ च्या ग्राम विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत सन २०२२ – २०२३ मौजा वेजगाव येथे ऋषी चंद्रगिरवार यांचे घरापासून ते परशुराम लेडांगे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये आणि लोकप्रतिनिधी ने सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावापर्यंत मूलभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत सन २०२१ – २०२२ नुसार मौजा सरांडी येथे बसस्टॉप ते रावजी मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी सरांडी येथे लाठीचे सरपंच विनोद जगताप, उपसरपंच साईनाथ कोडापे, माजी सरपंच तथा सेवा सह. सोसायटी अध्यक्ष प्रवीण लोखंडे, रत्नाकर पाल, सुमनबाई गेडाम, किशोर मेगरे, ग्रा. प. सदस्य सुनील चावरे, संगीता चौधरी, महानंदा कवलकर, उमनबाई मडावी, यशोदाबाई नगराळे, अशोक कवलकर, गजानन निकोडे, ऋषीं चांदेकर, संजय घोडाम, रमेश जगताप, नरेंद्र चौधरी, वेजगाव येथे सरपंच मनीषा वाघाडे, उपसरपंच वारलु देवगडे, ग्रा. प. सदस्य रवीना लेडांगे, नरेंद्र वाघाडे, राजू पेंदोर, माजी तमुस अध्यक्ष विलास आरेकर, विनोद लेडांगे, गुरुदास झाडे, सदाशिव पांडव, उद्धव आस्वले, विनोद लेडांगे, रामचंद्र रासपल्ले, दौलत लेडांगे, शशिकला रासपल्ले, बाबुराव रासपल्ले, वैभव आरेकर, वैभव रासपल्ले, संध्या रासपल्ले, ऋषी आरेकर, प्रवीण रासपल्ले यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!